
एक प्रायोगिक नाटक आणि एक " NOT So Commercial " गाणं यांची समीक्षा केल्यानंतर आता मी एक व्यावसायिक, TRP च्या खेळात सध्या सर्वात पुढे असलेल्या आणि मुंबई- पुण्यापासून ते पार खेडोपाड्यांत आणि महाराष्ट्राबाहेर गुजरात,हैद्राबाद सारख्या राज्य-शहरांमध्येच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, यु .के सारख्या सातासमुद्रा पार असणाऱ्या देशांमध्येही मराठी-अमराठी ही मर्यादा ओलांडून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या एका मराठी मालिकेविषयी लिहिणार आहे.
खरतर ,मालिकेची समीक्षा करणे मनात नव्हते , परंतु माझ्या अवतीभवती वावरणारी प्रत्येक व्यक्तीच त्या मालिकेमध्ये एवढी गुंतली गेली आहे कि निव्वळ त्यांना खिळवून ठेवणारी मालिका नक्की कशी आहे हे पाहण्यासाठी मी ती मालिका पाहू लागले आणि मालिकेच्या यशाचं गमक ध्यानात आलं...मालिकेचे दिग्दर्शक....मंदार देवस्थळी!! एक गुणी "off beat " दिग्दर्शक....त्यांच्या कामाचं certificate त्यांच्याच झी मराठीवर यापूर्वीच्या गाजलेल्या मालिकांनी दिले आहे.'आभाळमाया' , 'वादळवाट' सारख्या त्या-त्या वेळी सुरु असलेल्या मालिकांचा पायंडा मोडणाऱ्या आशयघन आणि शक्य तितक्या वास्तववादी मालिका त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत.
आत्ता काहीकाळ मराठी वाहिन्यांपासून दूर राहिलेल्या देवस्थळीनी मराठी प्रेक्षकांना दिवसभरचा शीणवटा दूर करण्यासाठी अगदी Prime Time ला "PRIME REFRESHMENT " भेट दिली आहे..."होणार सून मी ह्या घरची" या मालिकेच्या रुपात...
'६ सासू असणाऱ्या घरात जर मुलगी सून म्हणून गेली तर तिची काय अवस्था होईल??' ही या मालिकेची Tag line...वर वर पाहता हल्ली एक सासू सुनेचा ड्रामा पाहणे पचत नाही तिथे '६ सासू v/s १ सून ' म्हणजे निव्वळ boredom असणार असेच वाटले होते खरे, परंतु आत्ता पर्यंत सुरु असलेला Track पाहता, ही मालिका
सध्या सुरु असलेल्या मालिकांच्या ट्रेंड पेक्षा निराळी आहे. खरतर ही मालिका लोकप्रिय होण्यामागे या मालिकेचा साधा पण फ्रेश लूक, outdoor शूट, आणि उत्तम Team work ही कारण असावीत , अस म्हणण्यास हरकत नाही....
जान्हवी( तेजश्री प्रधान) आणि श्री (शशांक केतकर ) यांच्या रुपात बऱ्याच काळाने एक fresh romantic जोडी छोट्या पडद्यावर भेटीस आली आहे.त्याहीपेक्षा खूप दिवसांनी मराठीत एक नवीन प्रेमकथा दाखवली जात आहे.साधी, सरळ, हसरी, समजूतदार जान्हवी तरुणांची favourite झालेय आणि तरुणीच नव्हे तर आई-आजी या गटात मोडतील अशा सर्व वयोगटातील स्त्रियांना श्री च्या शांत,संयमी , प्रेमळ, स्त्रीचा आदर करणाऱ्या गुणी स्वभावाने आणि निरागस चेहऱ्याने भुरळ घातलेय.

जान्हवीच मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंब....पैसा आणि गरजा यांची सांगड घालताना कौटुंबिक जिव्हाळा जपणाऱ्या या कुटुंबाला बरीच मध्यमवर्गीय कुटुंबे " relate " करू शकतात. खाष्ट सावत्र आई (आशा चांदोरकर ) तिचा लालची- आळशी स्वभाव दाखवताना, अंगावर आणणारी आदळा आपट-हाणामारी ,षड्यंत्र लक्षात न राहता त्यातून निर्माण होणारी विनोद निर्मिती ते वातावरण हलक फुलक करते. प्रामाणिकपणामुळे हातून गेलेली नोकरी, पायाचे दुखणे याने हतबल झालेले परंतु स्वाभिमानी आणि आपल्या मुलीला समजून घेणारे बाबा (मनोज कोल्हटकर )...बाप लेकीच सुंदर मैत्रीपूर्ण नात या मालिकेत दाखवल आहे आणि म्हणूनच ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सावत्र असलेला ,शिक्षण अपूर्ण राहिलेला ,स्वतःची जबाबदारी टाळू पाहणारा , एरवी दंगा मस्ती करणारा आणि आईच्या खोट्या वागण्याची टिंगल करणारा परंतु जान्हवीच्या बाबतीत हळवा आणि Protective असणारा पिंट्या (रोहन गुजर ) बच्चे कंपनीचा आणि कॉलेज मधील मुलांचा लाडका होत आहे.जान्हवीच चाळीतल घर हा सेट नसून ते गोरेगावच्या एक खऱ्या चाळीतील घर आहे.या Real Location मुळे त्याचं मध्यमवर्गीय आयुष्य लोकांना खर वाटत- पटत.
बहुधा बऱ्याच काळानंतर दाखवली गेलेली चाळ संस्कृती , जान्हवी आणि श्रीच bus stop वर भेटण,रस्त्याने चालताना गप्पा मारण, देवळात जाणं..या साऱ्या 'Real location ' वर चित्रित केलेल्या प्रसंगांमुळे लोकांना ही मालिका जास्त आपलीशी वाटते.मोठ मोठ्या कृत्रिम एकाच सेट वर २४/७ घडणार नाट्य पाहण्यापेक्षा ; मोकळ्या खऱ्या लोकांमधल्या locations वर घडणार नाट्य लोकांना नक्कीच भावतंय म्हणूनच या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वर सांगितल्या प्रमाणे देश - विदेशात आहे.
बरेचदा मालिकेची नायिका ही घरातच बसलेली दाखवली जाते, मात्र या मालिकेतील नायिका-जान्हवी ही बँकेत काम करते. तिचे सहकारी,supportive बॉस हे पाहताना नुकत्याच ऑफिस मधून आलेल्या प्रेक्षकांनाही त्यांचा दिवस- आयुष्य जान्हवी सोबत relate करता येत.ऑफिस मध्ये अतुल परचुरेनी साकारलेला विनोदी, भोळसट,supportive बॉस ही उत्तम ! परंतु Manager चे ऑफिस Hours मध्ये आपल्या Sub - Ordinates समोर बायको सोबत फोन वर लाडीगोडीने बोलन किंचित अति वाटत तरीही, त्यांनी साकारलेला समजूतदार बॉस प्रेक्षकांना जवळचा वाटतो..
श्री च्या घरी असणाऱ्या त्याच्या ६ आई म्हणजे शिस्तप्रिय, तत्ववादी आजी (रोहिणी हट्टंगडी ) ,त्याची आई (सुहिता थत्ते ), दुसऱ्यांच्या री ला री ओढणारी त्याची मोठी काकू (सुप्रिया पाठारे ),विसराळू लहान काकू (लीना भागवत) , लग्नाच्या आशेने अत्यानंद महाराजांच्या भक्ती रसात गुंग मावशी (स्मिता सरवदे) ,आणि स्पष्टवक्ती आत्त्या (पूर्णिमा तळवलकर ) यांच्या भिन्न स्वभावांमुळे विनोद निर्मिती होते.मात्र आता त्यांच्या स्वभावान मुळे होणारी विनोद निर्मिती जरा Predictable झाली आहे. परंतु या सहा जणींचा या क्षेत्रातील अनुभव आणि नवीन कलाकारांचा उत्साह यांच्या जुगलबंदीमुळे मालिका मनोरंजक होते.
जान्हवीच्या मागे लग्नासाठी बळजबरी करणारा नीच प्रवृत्तीचा ,बायकांच्या बाबतीत जरा सैल असलेला अनिल (सतीश सलागरे) उत्तम रंगलाय.नकारात्मक भूमिका असूनही त्याला एक विनोदी अंग असल्याने प्रेक्षकांना हा व्हिलन आवडतोय.
मालिकेतील प्रत्येक लहान मोठ्या पात्राला त्याची एक स्वतंत्र जागा बनवायला- प्रेक्षकांमध्ये ओळख व्हायला वाव देण ही देवस्थळीनची खासियत ! आभाळमाया, वादळवाट आणि आत्ता ही मालिका...तिन्हींमध्ये साधर्म्य हेच की, ती मालिका त्यातील प्रत्येक पात्रासाठी- पात्रासह लक्षात राहते. ती केवळ मुख्य पात्रांभोवातीच नाही फिरत,तर प्रत्येक Charecter ला स्वतःच मत असत आणि म्हणूनच ते लोकांपर्यंत पोहचत.
देवस्थळीनच्या मालिका स्त्री पात्राभोवती फिरणाऱ्या असतात ,परंतु स्त्री शक्ती दाखवण्यासाठी स्त्री वर अन्यायच करावा लागतो- तिला मारहाण च करावी लागते, संशयाच्या सापळ्यात अडकवाव लागत या सध्या इतर वाहिन्यांवरील मालिकांचा USP ला छेद देत देवस्थळीनी एक साधी प्रासंगिक विनोदाची झालर असलेली , प्रेक्षकांना आपल्या आयुष्याचा एक भाग वाटणारी, त्यांना पात्रांसोबतह relate करायला लावणारी ,निखळ मनोरंजन देणारी मालिका निर्माण केली आहे आणि म्हणूनच सर्वच स्तरातील प्रेक्षकांनी तिचे स्वागत केले आहे.
आता ही मालिका पुढील किती काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते हे मालिकेची संहिताच ठरवेल....उत्तम सुरवात झालेल्या या मालिकेने आपला दर्जा कायम ठेवावा हीच अपेक्षा!!!
या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे ' होणार सून मी ह्या घरची ' ही मालिका चांगलीच आहे. आम्ही ही मालिका दररोज न चुकता बघत असतो. रोहिणी हट्टंगडी या श्रेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांचे सुरुवातीच्या काळातील नाटक ' चांगुणा ' नाट्यस्पर्धेत खूप गाजले होते. या नाटकामुळेच त्या प्रसिद्ध झाल्या. नंतर त्यांचे चित्रपट ' सारांश ' , ' गांधी ' इ. तर गजलेच; पण त्यापेक्षा त्यांच्या भूमिका जास्त गाजल्या. श्रीची आई नर्मदा [ सुहिता थत्ते ] यांना पूर्वी ' उत्तरायण ' चित्रपटात पाहिले होते. त्यांची ती भूमिका आजही लक्षात आहे. पाठारे , लीना भागवत आणि इतर आयांच्या भूमिका चांगल्या आहेत. जान्हवी चे वडील, आई , पिंट्या , मामा, अनिल आपटे सर्वांच्या भूमिका उत्तम. अतुल परचुरे चा प्रश्नच नाही. झकास. तो श्रीचा शिपाई मस्त. आणि above all श्री आणि जान्हवी ची जोडी एकदम परफेक्ट. त्यांचा आवाज, संवाद फेक आणि वास्तव अभिनय अप्रतिम. अर्थात या सर्वांचे श्रेय देवस्थळी यांचे आहे. या सर्व बाबीमुळे आजपर्यंत ही मालिका टाॅपवर आहे; आणि हे परवाच्या ' पेठे अवार्ड्स ' वरून सिद्धच झाले. तेव्हा या मालिकेस खूप खूप शुभेच्छा.
ReplyDelete